स्वामी स्वरुपानंद विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज
पावस मधिल शिक्षक व विद्यार्थ्यांची 'प्रचितगड' वर यशस्वी चढाई.
दि. ३ जानेवारी २०१४ रोजी स्वामी स्वरुपानंद
विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज पावस मधिल शिक्षक व विद्यार्थ्यांनी 'प्रचितगड' वर
यशस्वी चढाई केली. या ट्रेकचं नेतृत्व श्री. प्रसादे ज्युनिअर कॉलेज शिक्षक यानी
केले होते. यामध्ये
सौ. स्नेहा लिंगायत (५२), सौ. समिधा नार्वेकर (३२), श्री. भेलेकर (४२), श्री. सचिन कडवेकर (३५), श्री. सुदाम चौरे (३२), श्री. दिनकर गावित (२८), श्री. उमेश आंबेकर (३१), श्री. सुनिल अलकुटे (२५), श्री. अंकुश कांबळे (२५), कु. संकेत लिंगायत (२०), कु. शुभम चव्हाण (१७) व
कु. संजय नैकर (२१) असे एकुण १३ व वाटडे श्री. मनोज म्हस्के (शृंगारपुर).
ज्याठिकाणाहून सुरुवात केली ते शृंगारपुर गावातील मारुतीमंदिर व पार.
गावातून पुढे गेल्यावर जिथे जंगल सुरु होते तेथे गणेशविसर्जनासाठी बांधलेला घाट. येथपर्यंत रस्ता आहे.
पुढिल वाट दाट जंगलातून व डोंगरचढणीची आहे. बर्याच ठिकाणी खडी चढण आहे.
गडाच्या शेवटच्या ट्प्प्यात कठिण चढाई करावी लागते. संयम आणि धीराची ठेवावा.
ईथून पुढे चढताना काहीठिकाणी गवकर्यांनी शिड्यांची व्यवस्था केली आहे. त्यांचे आभार मानायला हवेत.
प्रवेश दराजवळची शिडी आता खूप जुनी झाली आहे. व त्यातील बर्याचश्या पायर्या गंजून मोडल्या आहेत.
गडावर पोहोचल्यावर जवळच एक पण्याचं टाकं आहे. पण तेथील पाणी पिण्यायोग्य नाही.
पुढे गेल्यावर एक छोटसं मंदिर आहे. बाजुच्या पायवाटेने पुढे गेल्यावर एक सहज न दिसणार बंधिस्त पाण्याचं टाकं आहे. पाणी पिण्यासाठी सुंदर आहे.
पाणी पिऊन पुढे गेल्यावर थांबण्यासठी एक उंबराच झाड आहे. तिथे बसून विश्रांती व जेवण घेता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा